By  
on  

करण जोहरने वडिलांसाठी केली भावनिक पोस्ट, ‘कलंक’चं पोस्टर शेअर

करण जोहरचा आगामी सिनेमा ‘कलंक’ या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय पहायला मिळेल. करणने नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

https://www.instagram.com/p/Buq4z0-DoHy/?utm_source=ig_web_copy_link

या पोस्टरमध्ये एका माणूस आणि त्याच्यासोबत नावेत बसलेली स्त्री दिसत आहे. दोघांच्या अंगावर जुन्या काळातले पण उंची पेहराव आहेत. तळ्याच्या मधोमध असलेल्या या नावेच्या आसपास कमळ दिसून येत आहे. या फोटोला कप्शन देताना करण म्हणतो. ‘हा सिनेमा १५ वर्षांपूर्वी माझ्या मनात उमटला होता. माझ्या वडिलांनी जाण्यापूर्वी या सिनेमावर काम केलं होतं. हा सिनेमा पाहणं त्यांचं स्वप्न होतं... मी ते पूर्ण करू शकलो नाही... माझा जीव तळमळला... पण आज त्यांच्या इच्छेला पडदा लाभला आहे... अस्थिर नाती आणि अनंत प्रेमाच्या गोष्टीला आवाज मिळाला आहे. ४०च्या दशकावर आधारलेला हा सिनेमा... उद्यापासून याचा प्रवास सुरु होत आहे... मला आशा आहे तुम्हीही माझ्यासोबत या वाटेवर याल’…. करणचा हा सिनेमा १९ एप्रिलला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive