By  
on  

कलंक’च्या देव चौधरीला भेटा, आदित्य रॉय कपूर दिसत आहे अनोख्या अंदाजात ‘

करण जोहरचा आगामी सिनेमा ‘कलंक’ या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय पहायला मिळेल.

https://www.instagram.com/p/Bus1HO_j_Pi/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमातील कलाकारांच्या व्यक्तिरेखेच्या जिज्ञासेवरून करण जोहर हळूहळू पडदा हटवत आहे. पहिल्यांदा त्याने वरुणचा लूक जाहिर केला. या सिनेमात वरूण जफर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

https://www.instagram.com/p/BusgwVQjy1R/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमातील आदित्य रॉयकपूरचा लूकही समोर आला आहे. आदित्य या सिनेमात देव चौधरीची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘निर्मळ हृदय आणि विशुद्ध मन, सादर करत आहे देव चौधरी’ असं कॅप्शन करणने या फोटोला दिलं आहे. या फोटोंमुळे सिनेमाची उत्सुकता आणखी वाढत आहे याविषयी शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive