By  
on  

‘नोटबूक’ सिनेमातील ‘लैला’ गाणं रिलीज, दिसली अव्यक्त प्रेमाची हळवी केमिस्ट्री

सलमान खानची निर्मिती असलेल्या ‘नोट्बूक’ सिनेमातील ‘लैला’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रनुतन आणि जहीर या दोघांच्याही हळव्या प्रेमाचा साज लाभला आहे. रोमॅंटिक ड्रामा प्रकारात मोडत असलेला हा सिनेमा यावर्षी रिलीज होत आहे. अभेन्द्र उपाध्याय आणि विशाल मिश्रा यांनी या गाण्याला शब्दबद्ध केलंय. तर ध्वनी भानुशालीने या गीताला स्वरसाज चढवलाय.

https://www.youtube.com/watch?v=4fHZQs6a1hc

एका हळव्या मुलीला होणारी प्रेमाची अनुभूती या गाण्यातून दाखवली आहे. या गाण्याला काश्मीरच्या सौंदर्याची किनार लाभली आहे. या सिनेमाचा बराच मोठा भाग काश्मीरमध्ये चित्रित केला आहे. नोटबुकच्या कथेनुसार चित्रिकरणासाठी काश्मीर हेच योग्य ठिकाण असल्याचे या सिनेमाच्या पार्श्वभूमीसाठी निवड केल्याचं सांगितलं आहे. हळूवार संगीत आणि प्रभावशाली शब्द यामुळे लैला हे गाणं मनात रेंगाळत राहतं.  हा सिनेमा २९ मार्च २०१९ ला रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive