By  
on  

माधुरीचा ‘कलंक’मधील हा लूक रसिकांना करणार घायाळ

कालपासून ‘कलंक’मधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे फोटो समोर येत आहेत. त्यापैकी आज सौंदर्यवती माधुरीचा लूक रिलीज झाला आहे. माधुरीच्या या लूकमुळे पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडाल यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/BuvnQvonmQR/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमात माधुरी पुन्हा एकदा नर्तिकेचा रोल करणार हे स्पष्ट झालं आहे. ‘तिला कुणाची सावली होण्यापेक्षा अंधारात एकटं चालायला आवडेल. बहार बेगम’. लाल रंगाची ओढणी डोक्यावर घेतलेल्या माधुरीचा फोटो खुपच मोहक आहे.  माधुरीने या आधीही ‘देवदास’ सिनेमात चंद्र्मुखी नावाच्या नर्तिकेचा रोल केला होता. कलंकच्या पोस्टरमध्ये नृत्य करताना माधुरीची सावली दिसत आहे. त्यामुळे कलंकमध्ये माधुरीच्या सौंदर्यसह नृत्याचाही आनंद रसिकांना घेता येणार आहे. करण जोहरचा आगामी सिनेमा ‘कलंक’ या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय पहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive