By  
on  

कंगना राणावतच्या ‘पंगा’ सिनेमाचं पोस्टर रिलीज, या अभिनेत्यासोबत जुळली केमिस्ट्री

कंगना राणावतच्या बाबतीत कितीही वाद-विवाद होत असले तरी आजघडीला ती सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’च्या यशाने कंगनाला आभाळ ठेंगणे आहे. याच दरम्यान तिच्या आगामी ‘पंगा’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. या सिनेमासाठी कंगना ‘बरेली की बर्फ़ी’ फेम दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी हिच्यासोबत काम करत आहे. आज या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या सिनेमात अभिनेता जस्सी गिल कंगनासोबत असणार आहे.

https://www.instagram.com/p/ButSZHxHtY7/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोमध्ये कंगना गायक-अभिनेता जस्सी गिल सुर्यास्त पाहताना हास्यविनोदात बुडलेले दिसत आहेत. या फोटोसोबत अश्विनीने रिलीज डेटही सांगितली आहे.

https://www.instagram.com/p/BuZHuTJnykT/?utm_source=ig_web_copy_link

उत्तर भारताच्या धर्तीवर या सिनेमाची कथा बेतली आहे. कंगनाची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात ही एक अशा मुलीची कहाणी आहे, जी लग्नानंतरसुध्दा कबड्डी खेळावर तितंकच प्रेम करते. तलवारबाजी नंतर कंगनाला कब्बडी खेळताना पाहणं चाहत्यांना पर्वणी ठरणार आहे. हा सिनेमा २४ जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive