By  
on  

अखेर सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं का रिअल लाईफ ‘लेडी लव्ह’? हिच्याशी जोडलं जातंय नाव

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या ब्रेक अप आणि लिंक अपच्या बातम्या रोज येत असतात. पण चाहत्यांनाही आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहीत करून घेण्याची इच्छा असते. सध्या चर्चा आहे ती सिद्दार्थ मल्होत्राच्या लिंक अपची. सिद्धार्थ सध्या नवोदित अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत अनेकदा स्पॉट झाला आहे. ही जोडी अलीकडेच ‘बदला’ सिनेमासाठी एकत्र जाताना दिसली. आलिया सोबतच्या ब्रेकअप नंतर सिद्धार्थ बराच काळ एकटा होता. पण आता त्याच्या आयुष्यात कोणीतरी स्पेशल आल्याचं दिसत आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’मध्ये तारा टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत झळकणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच ती सिद्धार्थसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. ताराचं नाव याआधी ईशान खट्टरशी जोडलं गेलं होतं.

https://www.instagram.com/p/BtbTwSWBzST/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Bss5m-CBOcz/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive