By  
on  

काश्मिरी लोकांचं जगण पडदयावर मांडणारा सिनेमा, ‘नो फादर्स इन कश्मीर’

आजवर अनेक सिनेमांनी काश्मिर आणि काश्मिरी लोकांच्या जगण्याचं वास्तव प्रेक्षकांसमोर आणलं आहे. याच यादीत अजून एका सिनेमाची भर पडली आहे. ब-याच कालावधीपर्यंत असलेली बंदी उठल्यानंतर ‘नो फादर्स इन कश्मीर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अश्विन कुमार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात आलिया भट्टची आई सोनी राजदान यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाच्या रिलीज़साठी जवळपास ८ महीने सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष करावा लागला.
एक ब्रिटीश मुलगी वडिलांचा शोध घेण्यासाठी काश्मिरमध्ये येते. यावेळी माजिद नावाचा मुलगा तिची मदत करतो हे पडदयावर दाखवलं आहे. या सिनेमात द्वेष आणि न्यूडीटीशी संदर्भात चित्रण असल्याने या सिनेमावर बंदी घातली होती. पण ही बंदी आता उठवली गेली आहे. हा सिनेमा पाच एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=vqNbLYjUPqE

Recommended

PeepingMoon Exclusive