By  
on  

विकी कौशल पुन्हा ‘सिंगल’ ? हरलीनने केलं अनफॉलो, चाहत्यांना उत्सुकता

सध्या बॉलिवूडमधील हॉट कपलच्या यादीत विकी कौशल आणि हरलीन सेठीचं नाव वरच्या क्रमांकावर आहे. पण या गोड नात्यात आता दुराव्याचा कडवटपणा आला आहे.
काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची कबूली या जोडप्याने दिली होती. ‘उरी’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीलाही या दोघांच्या एकत्रित फोटोचं कौतुक केलं गेलं होतं.

https://www.instagram.com/p/BsuaSGthXME/?utm_source=ig_web_copy_link

हरलीन आणि विकी वर्षभर एकमेकांना डेट करत आहेत. उरीचं यश साजरं करताना विकी आणि हरलीनचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यामुळे हरलीनने विकीला अचानक अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. विकी सध्या यशाच्या शिखरावर आहे तर हरलीन अजूनही यशाच्या शोधात आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive