By  
on  

राधिका आपटे म्हणते, ‘मी अजूनही यशापासून लांबच’

वेबसिरीजची राणी असं जिला म्हणलं जातं ती अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. २०१८ घुल , लस्ट स्टोरीज़, सेक्रेड गेम्स सारख्या वेबसिरीजमध्ये राधिकाच्या अभिनयाला नावाजलं गेलं . याशिवाय ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून हे यशस्वी सिनेमेही तिच्या खात्यावर जमा झाले आहेत. राधिकाची पाची बोटं तुपात असताना तिला मात्र असं वाटत नाही.
‘अजूनही मी ठरवलेलं ध्येय अजून साध्य झालं नाही. त्यामुळे माझ्यासाठी यशाचं शिखर अजूनही लांब आहे.’ असं राधिकाने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं. राधिका आगामी सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीक़ीसोबत दिसणार आहे. ‘रात अकेली है’ असं नाव असलेल्या या सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bu0qlJSHE_M/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive