अजय देवगण पडद्यावर साकारणार स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तिरेखा

By  
on  

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. कॉमेडी असो किंवा सिरीयस अजयने प्रत्येक व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. आता अजय एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. अजय लवकरच स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक
यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ असं नाव असलेल्या सिनेमात अजय ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं समजतं. विजय कर्णिक हे नाव १९७१ च्या लढाईशी निगडीत आहे. या युद्धादरम्यान कर्णिक भूज एअरपोर्टचे इनचार्ज होते. त्यावेळी कर्णिक यांनी धाडस दाखवून गावातील ३०० महिलांच्या मदतीने उध्वस्त झालेली भूज एअरस्ट्रीप पुन्हा बांधून घेतली. त्यामुळेच पाकिस्तानवर मात करण शक्य झालं. या सिनेमाशिवाय अजयचा बहुचर्चित सिनेमा तानाजीदेखील यावर्षी रिलीज़ होणार आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/1107874340115230721

Recommended

Loading...
Share