‘ट्युबलाईट’ सिनेमा या दिवशी रिलीज करायला नको होता : सलमान खान

By  
on  

सलमान खान एक चालता फिरता ब्रॅण्ड आहे असं म्हटलं तरी चुकिचं ठरणार नाही. कारण सलमान ज्या प्रोजेक्टला हात लावतो. त्याचं सोनं होतं. पण याला अपवाद ठरला होता तो होम प्रॉड्क्शनचा ट्युबलाईट सिनेमा. सलमानला या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा होत्या. पण ईददिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणकून मार खाल्ला. अलीकडेच एका प्रथितयश मिडिया हाऊसशी बोलताना सलमानने ट्युबलाईटच्या अपयशाचं स्पष्टीकरण दिलं.

सलमान म्हणतो, ‘ हा सिनेमा ईद दिवशी रिलीज करायलाच नको होता. या दिवशी लोक निवांत मूडमध्ये असतात. लोकांना हा सिनेमा त्या दिवशी दाखवून इमोशनल करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळेच सिनेमाला अपयशाचं तोंड पहावं लागलं. हा सिनेमा इतर कोणत्याही सामान्य दिवशी रिलीज करायला हवा होता.’ सलमान सध्या आगामी ‘नोटबूक’च्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातून प्रनुतन बहल आणि जहीर इक्बाल यांना सलमान लाँच करत आहे.

Recommended

Loading...
Share