पुन्हा एकदा २१ हा आकडा ठरला अक्षयसाठी लकी, का ते जाणून घ्या

By  
on  

कुणासाठी कधी काय लकी ठरेल हे सांगता येत नाही. अक्षय कुमारचंच बघा ना, त्याला २१ हा नंबर खुपच लकी ठरला आहे. होळी दिवशी रिलीज झालेला सिनेमा केसरी यशाचं नवं शिखर सर करत आहे. केसरी हा २१ शिखांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा देखील २१ तारखेलाच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे केसरीचं एका दिवसाचं कलेक्शन देखील २१.६ कोटी इतकं आहे. ते अजून वाढतच राहिल यात शंका नाही.

केसरीच्या यशाचं समीक्षकांनीदेखील कौतुक केलं आहे. अक्षयचा या वर्षी रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. अक्षयच्या मागील वर्षी रिलीज झालेल्या गोल्डने देखील चांगली कामगिरी केली होती. गोल्डला बॉक्स ऑफिसवर जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ची चांगली स्पर्धा होती. पहिल्याच दिवशी २० कोटींचा पल्ला पार करणारे अक्षयचे अजून दोन सिनेमे आहेत. त्याच्या २.० च्या हिंदी वर्जनने आणि सिंग इज ब्लिंगने देखील पहिल्याच दिवशी ही मॅजिकल फिगर पार केली होती. केसरी सध्या देशभरातील ३६०० स्क्रीनवर दाखवला जात आहे. त्यामुळे कमाईचे आणखी आकडे वाढतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share