बॉक्स ऑफिसवरही चढला ‘केसरी’ रंग, तिस-या दिवशी केली बक्कळ कमाई

By  
on  

सध्या सगळ्या बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ रंग चढला आहे की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. ‘केसरी’ तिस-या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठा आकडा गाठताना दिसत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई केली होती. तर दुस-या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. तिस-या दिवशी २० कोटींची कमाई केली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशीही कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://twitter.com/taran_adarsh/status/1109703272632217601

 

त्यामुळे केसरीची तीन दिवसातील कमाई ५८ कोटी आहे. २०१९मधील जास्त ओपनिंग मिळवण्याचा मान ‘केसरी’ ने मिळवला आहे. ‘केसरी’ सर्वात सिनेमा 1897 साली झालेल्या सारागढी युध्दावर आधारीत आहे. शीखांनी आपल्या मोजक्याच तुकडीच्या सैन्याच्या जोरावर हजारो अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडलं होतं. अक्षयसोबत या सिनेमात परिणीती चोप्रा आहे.हा सिनेमा २१  मार्च ला रिलीज झाला आहे.

 

Recommended

Loading...
Share