By  
on  

अजय देवगणच्या ‘तानाजी: द अनसंग वॉरिअरची’ रिलीज डेट बदलली, हे आहे कारण

अजय देवगण एक उत्तम अभिनेता आहे याबद्दल कुणाचंही दुमत नाही. अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. कॉमेडी असो किंवा सिरीयस अजयने प्रत्येक व्यक्तिरेखेत जान ओतली आहे.

https://www.instagram.com/p/BoI4tT0Bky4/?utm_source=ig_web_copy_link

अजयचा महत्वकांक्षी सिनेमा तानाजी: द अनसंग वॉरिअर’ यावर्षी रिलीज होणार असल्याचं बोललं जात होतं. पण काही कारणास्तव या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली आहे. हा सिनेमा यापुर्वी २७ डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा १० जानेवारी २०२०मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मिती भुषण कुमार आणि अजय देवगण यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. समीक्षक तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती शेअर केली आहे. ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1109676510875508737

Recommended

PeepingMoon Exclusive