By  
on  

लव रंजन यांच्या आगामी सिनेमात दीपिका आणि रणबीर दिसणार एकत्र

काही दिवसांपुर्वी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर  एका रंगाच्या जाहिरातीत चमकले होते. त्यांच्या या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. रणबीर दीपिकाचे चाहतेही या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात. आता ही जोडी एका सिनेमात एकत्र येणार असल्याचं समोर आलं आहे.

दिग्दर्शक, निर्माते लव रंजन या जोडीला एकत्र घेऊन सिनेमा करणार असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय या सिनेमात अजय देवगणही मुख्य भूमिकेत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार हा या दोघांचा एकत्रित चौथा सिनेमा असेल. यापुर्वी या दोघांनी  ‘तमाशा’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘बचना ऐ हसीनो’मध्ये एकत्रित काम केलं आहे. लव रंजन यांनी यापुर्वी ‘सोनू के टिटू की स्विटी’ची निर्मिती केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive