By  
on  

सलमान-अरबाज ही जोडगोळी इंदौरच्या दौ-यावर, सुरु केली ‘दबंग ३’ची तयारी

प्रेक्षकांचा लाडका चुलबूल पांडे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सिद्ध झाला आहे. सलमान आणि अरबाज ही जोडगोळी दबंग ३च्या शुटिंगसाठी इंदौरला रवाना झाले आहेत. ३१ मार्चला सलमानने अरबाजसोबत एक व्हिडियो शेअर केला होता. त्यात सलमान म्हणतो, ‘मी आणि अरबाज दबंग ३ च्या शुटिंगसाठी इंदौरला पोहोचलो आहेत. तिथून आम्ही महेश्वरला जाणार आहोत. इंदौरमध्ये आमचा जन्म झाला होता. आणि महेश्वरला, जिथं आम्ही शुटिंग करणार आहोत तिथं आमचे आजोबा पोलिसखात्यात असताना कार्यरत होते.

https://www.instagram.com/p/BvrJYOFgkt4/?utm_source=ig_web_copy_link

सलमानने ‘भारत’चं शुटिंग पुर्ण केलं असून त्याचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु आहे. त्यामुळे सलमान आता दबंगच्या तिस-या भागाच्या तयारीला लागला आहे. हा सिनेमा डान्स किंग प्रभुदेवा दिग्दर्शित करत आहे. अरबाज या सिनेमाचा निर्माता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive