By  
on  

‘सेक्रेड गेम्स २’ मध्ये कल्की कोचलिन मुख्य भुमिकेत? काटेकरचीही वापसी?

वेबसिरीजच्या भाऊगर्दीत अढळ स्थान मिळवलेली वेबसिरीज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. या वेबसिरीजने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आता या वेबसिरीजचा दुसरा पार्ट कधी येणार याची रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजच्या मेकर्सनी १९ मार्चला सोशल मिडियावर एक व्हिडियो शेअर केला होता त्यात लिहिलं होतं. कॅलेंडरवर १४ तारीख नोंद करून ठेवा. कारण त्यादिवशी काहीतर मोठं घडणार आहे. एका पोर्ट्लच्या संदर्भाने या वेबसिरीजमध्ये आता कल्की कोचलिनही दिसणार आहे अशी चर्चा आहे.

https://twitter.com/NetflixIndia/status/1112586203143028736

याशिवाय मेकर्सनी नुकत्याच लाँच केलेल्या व्हिडियोत काटेकर, कुक्कु आणि बंटी दिसून येत आहेत. दुस-या एपिसोड्सची नावं ‘बिदल ए गीता’, ‘कथम अस्ति’, ‘अन्तर महावन’ आणि ‘अनागमम्’ अशी आहेत. अशा वैशिष्ट्यपुर्ण नावामुळे दुसरा सीझन वेगळा असणार यात शंका नाही.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive