अजयचा खुप दिवसांनी दिसला रोमॅंटिक अंदाज, ‘दे दे प्यार दे’चा ट्रेलर रिलीज

By  
on  

अ‍ॅक्शन हिरोचा किताब मिळवलेल्या अजय देवगणचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजयच्या आगामी ‘दे दे प्यार दे’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात तो तब्बू आणि रकुल प्रीतसोबत झळकणार आहे. अजय खुप दिवसांनी या सिनेमात रोमान्स करताना दिसत आहे. आपल्या वयाच्या निम्म्या वयातील मुलीशी रोमान्स करत असलेला अजय तिला घरच्यांना भेटवायला घेऊन जातो. पण तिथे त्याची भेट पहिल्या पत्नीशी होते. यातून निर्माण होणारा विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवेल यात शंका नाही. या सिनेमात आलोकनाथ देखील दिसत आहेत. ‘मी टू’च्या आरोपानंतर ते पहिल्यांदाच एखाद्या सिनेमात दिसत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १७ मे २०१९ ला रिलीज होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=EJUD2PptXrk

Recommended

Loading...
Share