लालित्यपुर्ण पदन्यास, मनमोहक अदा, माधुरीचं हे गाणं पाहुन तुम्ही म्हणाल ‘तबाह हो गये’

By  
on  

माधुरी दीक्षितच्या सौंदर्य आणि अदांचा मनोहारी मिलाफ असलेलं ‘कलंक’मधील ‘तबाह हो गये’ गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘तबाह हो गये’ असे बोल असलेल्या या गाण्यात माधुरीने तिच्या नृत्याची आणि सौंदर्याची जादू चालवली आहे. या सिनेमात माधुरी एका नर्तिकेच्या व्यक्तिरेखेत दिसून येत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत. प्रीतमने संगीतसाज चढवला आहे तर श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. श्रेयाच्या आवाजातील हे कलंकमधील दुसरं गाणं आहे.

https://www.youtube.com/watch?v=C4-ytMDgg6s

माधुरीने या गाण्यात केशरी रंगाचा घागरा घातला आहे. माधुरी या सिनेमात साकारत असलेली ‘बहार बेगम’ ही व्यक्तिरेखा सिनेमात खुप महत्त्वाची आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यापूर्वी ही भूमिका साकारणार होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर ही भूमिका माधुरीला ऑफर करण्यात आली. माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि आलिया अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळणार असून येत्या 17 एप्रिलला ‘कलंक’ प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

Loading...
Share