‘कलंक’च्या सेटवर माधुरी दीक्षित भेटली या खास पाहुण्यांना

By  
on  

अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित वीस वर्षांनी ‘कलंक’मधून एकत्र येत आहेत. एकेकाळी बॉलिवूडचं सेंसेशनल कपल अशी चर्चा असलेल्या या दोघांबद्दल रसिकांमध्ये आजही उत्सुकता आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना संजयने माधुरीबद्दल त्याचं मत सांगितलं. संजय म्हणतो, ‘माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव खुपच छान आहे. सुरुवातीला मी खुप नर्व्हस होतो. पण तिच्या अभिनयामुळे मला सहज वाटण्यास मदत झाली. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आम्ही आमच्या मुलांबद्दल देखील खुप चर्चा केली. मी माझ्या मुलांना शाहरान आणि इकरा यांची माधुरीशी ‘कलंक’च्या सेटवर भेटही घालून दिली.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारर ‘कलंक’  येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Recommended

Loading...
Share