By  
on  

‘राझी’गर्ल आलिया भट्ट यासाठी भारतात करू शकत नाही मतदान

सध्या देशात निवडणुकांचं वारं वहात आहे. सेलिब्रिटीही सामान्य जनतेला मतदानासाठी आवाहन करताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट मात्र भारतात राहूनही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. याला कारण आहे पासपोर्ट.

आलिया भारतात रहात असली तरी तिचा पासपोर्ट इथला नाही. आलिया आणि तिची आई सोनी राजदान यांना ब्रिटीश नागरिकत्व आहे. भारतात दुहेरी नागरिकत्त्वाची पद्धत नसल्याने आलिया भारतात मतदान करू शकत नाही. भारतात मतदान करण्यासाठी तिला ब्रिटीश नागरिकत्त्व सोडावं लागेल. विशेष म्हणजे  ज्या कलाकारांना मतदानाची जनजागृती करण्यासाठी  सोशल मिडीयावर टॅग केलं होतं त्यात आलियाचं देखील नाव होतं. आलियासोबतच अक्षय कुमार, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण या कलाकारांकडेदेखील भारतीय पासपोर्ट नाही. त्यामुळे हे कलाकार देखील भारतात मतदान करू शकत नाहीत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive