By  
on  

विकी कौशल आता दिसणार अश्वत्थामाच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेमध्ये

सध्या विकी कौशलची बोटं तुपात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ‘उरी’च्या यशानंतर विकीचा भाव भलताच वधारला आहे. विकी आता एका ऐतिहासिक युद्धपटातून समोर येणार आहे. विकी आता महाभारतातील अश्वत्थामाच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार आदित्य धर पुन्हा एकदा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आदित्य ब-याच दिवसांपासून या कथेवर काम करत आहे. या सिनेमाचं नाव अजून नक्की झालेलं नाही. या वर्षाखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याचं बोललं जात आहे. अश्वत्थामा पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा आणि आठ चिरंजीवांपैकी एक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रॉनी स्क्रूवाला, विकी कौशल आणि आदित्य धर हे त्रिकुट पुन्हा एकत्र येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive