By  
on  

कंगना-राजकुमारच्या ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट ठरली

कंगनाच्या बहुप्रतिक्षित ‘मेंटल है क्या’ सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. यापुर्वी या ना त्या कारणाने या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडत होतं. हा सिनेमा २९ मार्चला रिलीज होणार होता. पण कंगनाच्या मणिकर्णिका सिनेमाच्या प्रभावामुळे हा सिनेमा पुढे ढकलला गेला. हा सिनेमा आता २१ जून २०१९ मध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाची निर्माती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटातून कंगना आणि राजकुमार दोघेही पूर्वीपेक्षा नव्या अवतारात आणि नव्या ढंगात दिसणार आहेत. या दोघांनी या पुर्वी ‘क्वीन’मध्ये एकत्र काम केलं आहे. ‘मेंटल है क्या’ चे यापुर्वी पोस्टर रिलीज झाले असून या दोघांचा हटके अवतार असल्याने रसिकांना या सिनेमाबद्द्ल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मेंटल है क्या’ ब्लॅंक कॉमेडी सिनेमा आहेच याशिवाय एक थरारपटही आहे. या सिनेमाच्या यापुर्वीच्या पोस्टरमध्ये दोघांचाही अनोखा अवतार दिसला होता.

https://www.instagram.com/p/BwV7nGSnCaw/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive