By  
on  

विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाच्या डबिंगला सुरुवात

फॅशन डिझायनर कम दिग्दर्शक विक्रम फडणीस सध्या नव्या सिनेमाच्या तयारीत गुंतले आहेत. त्यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाच्या डबिंगला सुरुवात झाली आहे. याचा फोटो नुकताच त्यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BwdrYJqgnHl/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाच्या मुहुर्ताला अभिनेता हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हे देखील उपस्थित होते. यासोबतच कियारा अडवाणी, श्वेता बच्चन, मनीष पॉल, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, आदिती गोवित्रीकर, ललित प्रभाकर हे कलाकार उपस्थित होते. या सिनेमात ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक हे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय आदिती गोवित्रिकरही या सिनेमात विशेष भूमिकेत आहे. . ‘स्माईल प्लीज’ हा विक्रम यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या भूमिका होत्या.  हा सिनेमा १९ जुलै २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या मुहुर्तापासूनच रसिकांना या सिनेमाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive