By  
on  

कृती सनोनने शेअर केला पानिपत सिनेमातील अनुभव

अभिनेत्री कृती सनोन सध्या आगामी 'पानीपत' या सिनेमात व्यस्त आहे. या बिग बजेट सिनेमात काम करणं म्हणजे एक स्वप्नपुर्ती असल्याचं तिने म्हटलं आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचं शुटिंग सर्वप्रथम जयपुरमध्ये पार पडलं. त्यानंतर आता मुंबईमध्ये शूट करत आहोत. एखादी कथा रचत जावी तसं हे सगळं हळू हळू आकार घेताना बघायला खुप छान वाटत आहे. जसं काही जादू घडत आहे.

‘पानीपत’ हा सिनेमा प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. मी कधीच विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या सिनेमाचा भाग असेन.’ या सिनेमात पानीपतच्या तिस-या युद्धाची कथा मांडली जाणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सुनीता गोवारीकर घरच्या एजीपीपीएल आणि व्हिजन वर्ल्ड यांनी एकत्रितरित्या सांभाळली आहे. या सिनेमात अर्जुन आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive