By  
on  

शाहरुख खानने गाण्यातून केलं लोकांना मतदान करण्याचं अपील

शाहरुख खानला प्रकाशझोतात राहायला कारण लागत नाही. अलीकडेच शाहरुखने एक व्हिडियो शेअर केला आहे. सध्या देशभरात निवडणुकांचं वातावरण आहे. अशा वेळी लोकांनी जास्तीतजास्त मतदान करावं यासाठी कलाकारही फॅन्सना आवाहन करत आहेत. शाहरुखनेही हटके स्टाईलने फॅन्सना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ‘करा मतदान’ असा आशय असलेलं हे गाणं तनिष्क बागचीने कंपोज केलं आहे तर, अब्बी वायरल ने लिहीलं आहे आणि खुद शाहरुख़ ख़ानने गायलं  आहे.

https://twitter.com/iamsrk/status/1120250790508224512

या गाण्याचं ट्वीट करून शाहरुख म्हणतो, पंतप्रधानांनी कलेच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन करण्याचं सुचवलं होतं. मला यासाठी थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही मतदानाला उशीर करू नका. मतदान करणं तुमचा अधिकार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive