By  
on  

या दिवशी सुरु होणार श्रद्धा आणि टायगरच्या ‘बागी ३’च्या शुटिंगला सुरुवात

‘बागी’ या सिनेमातून टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या जोडीला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. ही हिट जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मन जिंकायला तयार झाली आहे. एका प्रथितयश वृत्तपत्रानुसार, टायगर आणि श्रद्धा जुलैमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करतील. मुंबईतील शुटिंग संपल्यानंतर सिनेमाची टीम परदेशातील शुटिंगला रवाना होईल. मागील सिनेमांप्रमाणे बागी ३ मध्ये हाय अ‍ॅक्शन ड्रामा असणार आहे. मागील सिनेमांपेक्षा वेगळ्या आणि उच्च दर्जाची अ‍ॅक्शन या सिनेमात दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे. साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टुडियोज यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा ६ मार्च २०२०मध्ये रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive