By  
on  

अभिनेता सनी देओल याने केला भाजपात प्रवेश, ,गुरुदासपुर इथून लढवणार निवडणूक

अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज १२ वाजता दिल्लीतील पक्षाच्या ऑफिसमध्ये त्याने पक्षप्रवेश केला आहे. सनी कदाचित पंजाबमधील गुरुदासपुर येथून निवडणूक लढवेल.

सनी राजकारणात प्रवेश करणार याची चर्चा फार पुर्वीपासून होत होती. आज प्रवेशाने चर्चेवर शिक्कामोर्तब केलं आहे. यावर बोलताना सनी म्हणतो, माझे वडिल भाजपाशी आणि अटलजीशी खुप जोडलेले आहेत. मी आता मोदीजींशी जोडला गेलो आहे. मला वाटतं मोदीच पुढील वर्षी पंतप्रधान व्हावेत. कारण देशातील युवकांना त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. धर्मेंद्र यांनी देखील भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. याशिवाय हेमामालिनी या देखील भाजपाच्या सीटवर राज्यसभेत निवडून गेल्या होत्या.

Recommended

PeepingMoon Exclusive