By  
on  

अक्षय-ट्विंकलच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं पंतप्रधान मोदींनी

अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखत वेगाने व्हायरल होत आहे. अक्षयचा हटके प्रश्नांना पंतप्रधानांनी तितकीच खेळकर उत्तरं दिली आहेत. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या सोशल मिडियावरील तिरकस बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीवरही निशाणा साधत असते. यावरून अक्षयची फिरकी घेताना पंतप्रधान म्हणतात. मी सोशल मिडिया आवर्जून पाहतो. तुमचं आणि ट्विंकल यांचं ट्वीट देखील पाहतो. जेव्हा ट्विंकल माझ्यावर एखाद्या गोष्टीचा राग काढते त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण शांत असेल अशी आशा करत असतो. कारण माझ्यावर राग काढल्याने तिला तुझ्यावर रागवायची गरज लागत नसेल. अशा पद्धतीने मी तुमच्या दोघांच्या संसारात अप्रत्यक्षरित्या महत्त्वाची भूमिका बजावतो’. या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच अक्षयची फिरकीही घेतली आहे.

https://www.instagram.com/p/BwoZyIHly1c/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive