By  
on  

अखेर ठरलं ! ‘अंग्रेजी मिडियम’मध्ये करीना कपूर साकारणार ही भूमिका

आजारपणातून बरा झाल्यावर इरफान खान पुन्हा एकदा पडदा गाजवायला तयार झाला आहे. इरफान आगामी ‘अंग्रेजी मिडियम’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफानसोबत राधिका मदान आणि करीना कपूर झळकणार असल्याचं नक्की झालं आहे.

एका वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार करीना या सिनेमात पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात करीना काम करत असल्याची ग्वाही खुद्द दिग्दर्शक दिनेश विजान यांनी दिली आहे. याबद्द्ल बोलताना ते म्हणाले ‘हा रोल फक्त आणि फक्त करीनासाठीच लिहिला गेला आहे.’ या सिनेमात करीनाची भूमिका फार मोठी नसली तरी उत्तम आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग राजस्थानमध्ये सुरु आहे. यावेळी करीना लवकरच या युनिटला जॉईन करेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive