By  
on  

सुश्मिताने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटात दिसली अंगठी

सुश्मिता सेन सध्या तिच्या सिनेमांमुळे नाही तर बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत असते. सुश्मिताने अलीकडेच काही हटके फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या बोटात निळी डायमंड रिंग दिसून येत आहे. यासोबतच्या कॅप्शनवरून सुश्मिता आणि रोहमनचा गुपचुप साखरपुडा झाल्याचं बोललं जात आहे. या कॅप्शनमध्ये सुश्मिता म्हणते ‘कुणावर विनाअट प्रेम करणं खुप अवघड असतं. अशा वेळी मन आणि मेंदू यांच्यापैकी कुणाचं ऐकायचं हा प्रश्न पडलेला असतो. पण शेवटी मनातील भावना व्यवहारापेक्षा वरचढ ठरतात आणि आयुष्यात ख-या प्रेमाची ओळख पटते. कोणत्याही अटीशिवाय रोहमन शॉल मी तुझी आहे’.

https://www.instagram.com/p/BwumQWDBteA/?utm_source=ig_web_copy_link

या कॅप्शनवरून सुश्मिता आणि रोहमनने साखरपुडा उरकल्याची शंका चाहत्यांना येत आहे. सुष्मिता आणि रोहमन गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटदरम्यान या दोघांचीही भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहे. आता ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive