By  
on  

सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या लिंक अप्सवर तारा सुतारियाने सोडलं मौन

अभिनेत्री तारा सुतारियाबद्दल डेब्युपुर्वीपासूनच गॉसिप सुरु आहे. तिचं नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडलं जात होतं. हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. ही जोडी अलीकडेच ‘बदला’ सिनेमासाठी एकत्र जाताना दिसली. आलिया सोबतच्या ब्रेकअप नंतर सिद्धार्थ बराच काळ एकटा होता. त्यामुळे तारा त्याचं ‘लेडी लव्ह’ आहे की काय याची चर्चा रंगली होती. पण ताराने या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. तारा म्हणते, आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना डेट करत नाही आहोत. ते माझे शेजारी आहेत आणि अत्यंत चांगली व्यक्ती देखील आहे. आमच्यात केवळ सिनेमांच्या बाबतीत चर्चा होते. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत’.

 

Recommended

PeepingMoon Exclusive