By  
on  

प्रियांकाने शेअर केला ‘गर्ल्स नाईट’चा फोटो, इशा अंबानी सोबत परिणीतीही दिसली

देसी गर्ल प्रियांकाचे भारतात दौरे होतच असतात. यावेळीही मतदान करण्यासाठी प्रियांका भारतात आली आहे. मतदान केल्यानंतरचा एक सेल्फीही तिने पोस्ट केला होता. त्यापुर्वी रविवारी तिने गर्ल गॅँगसोबत खुप धमाल केली. या पार्टीचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या पार्टीत प्रियांका, परिणीती चोप्रा, ईशा अंबानी आणि राधिका मर्चंट दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/p/Bw0NOcqHMiN/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये प्रियांका म्हणते, घरी आईस्क्रीम बनवलेलं आहे. यजमान इशा अंबानीला धन्यवाद. तुझं घर खुप सुंदर आहे. कायम खुश रहा. अजून गर्ल्स नाईट बाकी आहेत. काही क्षणांसाठी आलिया भट्ट तुझी ही पार्टी मिस झाली.’ प्रियांकाचा हा किती दिवसांचा भारत दौरा आहे हे समजू शकलेलं नाही. प्रियांका लवकरच ‘स्काय इज द पिंक’ सिनेमात झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/BwsH5LkHY_L/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive