By  
on  

विकीच्या या लूकवर तुम्हीही व्हाल फिदा, दिसणार 'सरदार उधम सिंग' यांच्या भूमिकेत

सध्या विकी कौशल हे लाईमलाईटमध्ये असलेलं नाव आहे. विकी आगामी कोणत्या सिनेमातून समोर येणार याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. विकीचा आगामी सिनेमा एक बायोपिक आहे. विकी या सिनेमात ‘सरदार उधम सिंग’ यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/Bw3nWZ2Js-_/?utm_source=ig_web_copy_link

विकी या लूकमध्ये क्लीन शेवमध्ये दिसत आहे. हा फोटो परदेशातील असून उधम सिंग तिथे शिकत असतात. या सिनेमासाठी दिग्दर्शक शुजित सरकार यांची पहिली निवड इरफान खान होता. पण इरफानने आजारपणामुळे या सिनेमातून माघार घेतली आहे. त्यामुळे ही भूमिका विकीच्या वाट्याला आल्याचं शुजित सांगतात. या व्यक्तिरेखेसाठी विकी ही उत्तम निवड असल्याचं शुजित यांचं म्हणणं आहे. सध्या रशियात शुटिंग करत असलेली टीम काही दिवसांनी लंडन येथे शुटिंग करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive