By  
on  

आमीर खान आणि किरण राव यांनी लुटली उसाच्या रसाची मजा

सध्या उन्हाने कहर केला आहे. या उन्हाच्या तापापासून सुटका होण्यासाठी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या थंड पेयाचा आधार घेताना दिसत आहे. सुपरस्टार आमीर खान मात्र याला कसा अपवाद असेल. आमीरने नुकताच किरणसोबत एका गु-हाळावर उसाचा रस पिण्याचा आनंद घेतला. आमीर पाणी फाउंडेशनच्या कामानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहे. त्यावेळी झावदार्जून या गावात थांबून त्याने या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. आमीरने सोशल मिडियावर एका साध्या गु-हाळावर थांबून सामान्य नागरिकाप्रमाणे उसाचा रस आणि भेळ यांचा आस्वाद घेतला. आमीरच्या या फोटोवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. आमीरच्या साधेपणाचं कौतुकही यात अनेकांनी केलं आहे. आमीरच्या आवाहनामुळे आज अनेक सेलिब्रिटीही श्रमदानासाठी उतरले आहेत.

https://twitter.com/aamir_khan/status/1123409022160293889

Recommended

PeepingMoon Exclusive