By  
on  

आयुष्मान खुराणाचे सिनेमे त्याच्या मुलांना पाहण्यास आहे सक्त मनाई, का ते जाणून घ्या

अभिनेता आयुष्मान खुराणाने आजपर्यंत अनेक वैविध्यपुर्ण सिनेमे केले आहेत. हटके विषयाच्या निवडीमुळे त्याचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मागील वर्षं तर त्याच्यासाठी अत्यंत खास होतं. त्याचे दोन सिनेमे सुपरहिट ठरले. त्यामुळेच आयुष्मानचा सिनेमा म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची रसिकांना खात्रीच असते. पण आयुष्मानच्या मुलांना मात्र त्याचे सिनेमे बघायची अजिबात परवानगी नाही. अलीकडेच त्याने एका मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलं आहे.

https://www.instagram.com/p/BsIc8Xog3O0/?utm_source=ig_web_copy_link

आयुष्मान म्हणतो, ‘माझ्या सिनेमांचे विषय अनेकदा पठडीबाहेरचे असतात. काहीशा बोल्ड धाटणीचे सिनेमे असल्याने त्याची मांडणी, त्यातील काही सीनही बोल्ड असतात. त्यामुळे माझ्या मुलांनी त्यांच्या वडिलांना इतर स्त्रीबरोबर बोल्ड सीन किंवा किसिंग सीन करताना पाहणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळेच मी मुलांना माझे सिनेमे पहायला मनाई केली आहे.’ आयुष्मान एक उत्तम पती आहेच पण एक चांगला पिताही असल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive