By  
on  

अर्जुनच्या दमदार डायलॉग डिलीव्हरीने रंगलेला ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा ट्रेलर पाहिलात का?

अर्जुन कपूरच्या आगामी सिनेमांमध्ये ‘पानीपत’ची चर्चा जास्त असली तरी नुकताच त्याच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ सिनेमाच्या ट्रेलरने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. अर्जुन या सिनेमात हटके भूमिकेत दिसत आहे. अर्जुन ब-याच दिवसांनी एका वेगळ्या रुपात समोर येणार आहे. अर्जुनला या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. कारण अर्जुनने मागील दोन सिनेमे सलग फ्लॉप ठरले होते.

https://www.youtube.com/watch?v=xmab5E_62og

त्याच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘मुबारकां’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवली नव्हती. त्यामुळे हा सिनेमा अर्जुनच्या संथ करीअरला उभारी देईल अशी आशा आहे. या ट्रेलरवर सध्या लाईक्सचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण भारत आणि नेपाळमध्ये करण्यात आले आहे. हा चित्रपट २४ मे २०१९रोजी प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive