By  
on  

‘SOTY2’मध्ये टायगरचा व्हिडियो झाला रिलीज, पाहून तुम्हालाही येईल हसू

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित  ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ची चर्चा फॅन्समध्ये होऊ लागली आहे. या सिनेमातून दोन स्टारकिड्स अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूड डेब्युसाठी सज्ज झाले आहे. या तिघांच्या सिनेमातील लूक्सवर नेटिझन्सनी लाईक्सचा पाऊस पडत आहे. करणने नुकताच या सिनेमातील टायगरचा व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

https://www.instagram.com/p/Bw9VBfFhBxi/?utm_source=ig_web_copy_link

यामध्ये रोहन म्हणजेच टायगर श्रॉफ कबड्डी खेळताना दिसत आहे. मागील सिनेमात वरुण आणि सिद्धार्थ हे उत्तम स्विमर होते. या सिनेमासाठी पुनीतने टायगरला यथायोग्य कबड्डीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घ्यायला लावलं आहे. आत्तापर्यंत फक्त अॅक्शन आणि टिपीकल हिरोवाल्या भूमिकेत दिसणारा टायगर ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा नायक साकारताना खुपच उत्साही असल्याचं पाहायला मिळालं. येत्या 10 मे रोजी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा करण जोहरची निर्मिती असलेला फ्रेश सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive