By  
on  

नेहा धुपिया आणि अगंद बेदी लग्नाचा पाहिला वाढदिवस साजरा करणार मॉरिशसमध्ये

बॉलिवूडमध्ये कुणालाही कानोकान खबर लागू न देता नेहा धुपिया आणि अंगद बेदीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही महिन्यातच नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नेहा आणि अंगद आता पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या तयारीत गुंतले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगद बेदी आणि नेहा धुपिया ६ मेला मॉरिशस दौ-यावर जात आहेत. विशेष म्हणजे या दौ-यावर चिमुकली मेहरही त्यांच्यासोबत असणार आहे. यावर नेहा म्हणते, हा प्रवास मेहेरसाठी अवघड असणार आहे. हा तिचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. मेहेर दिड महिन्यांची असतानाच तिचा पासपोर्ट बनवला आहे. विशेष म्हणजे मेहर आणि अंगद या दोघांनानी बीचेस खुप आवडतात. त्यामुळे ही ट्रीप या दोघांसाठीही अविस्मरणीय राहिल. अलीकडेच नेहाला प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनासाठी ट्रोल केलं गेलं होतं. त्यावेळी नेहाने ट्रोलर्सचा कडक शब्दात सुनावलं होतं.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive