By  
on  

‘इमली’मध्ये कंगना ऐवजी दीपिकाची वर्णी? अनुराग बासूंनी दिले संकेत

अनुराग बासूंच्या ‘इमली’ या आगामी सिनेमा कंगना राणावत दिसणार अशी चर्चा होती. पण अलीकडच्या घटनांनी काही वेगळंच वृत्त हाती आलं आहे. कंगना या सिनेमातून बाहेर पडल्याचं वृत्त आहे. सिनेमाच्या आणि कंगनाच्या डेट्सचा घोळ होत असल्याने कंगना या सिनेमातून बाहेर पडल्याचं समजतं. या सिनेमात कंगनाची जागा दीपिका घेणार असल्याचं समजत आहे. दीपिकाशी याबाबत काही सकारात्मक चर्चा झाल्याचंही दिसून येत आहे. दीपिकाच्या सुचवण्यावरुन सिनेमात काही बदल केल्याचंही अनुराग यांनी स्पष्ट केलं. या सिनेमात दीपिकासोबत रणबीरची वर्णी लागेल असं बोललं जात आहे. सध्या दीपिका पदुकोण मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ सिनेमामध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive