By  
on  

रणबीर -आलियाचा ‘लेक कोमो’मध्ये लग्नाचा प्लॅन? पाहा सोनी राजदान काय म्हणतात

बॉलिवूडमध्ये एखाद्या नव्या कपलवर शिक्कामोर्तब झालं की त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागतात. रणबीर-आलिया या सुपरक्युट जोडप्याविषयीही अशाच चर्चा होत आहेत.  फॅन्सनी या जोडीचं ‘रालिया’ असं नामकरणही केलं आहे. रणबीर आणि आलिया ‘दीपिका आणि रणवीरप्रमाणेच लेक कोमोमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पण आलियाची आई सोनी राजदान यांनी या अफवा असल्याचं म्हणत या चर्चेतील हवा काढून घेतली. सोनी यांनी आयुष्यात स्वत:चे निर्णय योग्यप्रकारे घेण्यासाठी आलिया सक्षम असल्याचंही बोलून दाखवलं आहे.

 

काही मिडिया सोर्सच्या मते, रणबीर आणि आलिया युरोपमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहेत. सध्या आलिया जवळ तीन सिनेमे आहेत तर रणबीर त्याच्या आगामी सिनेमाला सुरुवात करणार आहे. ही जोडी अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्र’मध्ये एकत्र दिसणार आहे. एकमेकांशी रिलेशनशीपमध्ये असण्याआधी रणबीर कतरिना कैफसोबत तर आलिया सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ही जोडी एकमेकांच्या जवळ आली.

 

Recommended

PeepingMoon Exclusive