By  
on  

अमिताभ बच्चन दिसणार मराठी सिनेमात, या सिनेमातून येणार रसिकांसमोर

महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आजही त्यांच्या अभिनयाचे अगणित चाहते आहेत. अमिताभ यांच्या अभिनयाचा जलवा आता मराठी सिनेमातही दिसणार आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित सिनेमात बिग बी दिसणार आहेत. ‘ए बी बीआणि सी डी’ या सिनेमातून जवळपास २५ वर्षांनंतर बिग बी मराठी सिनेमात काम करणार आहेत. या सिनेमात बिग बी यांची विक्रम गोखले यांच्यासोबत काही दृश्य असल्याचीही चर्चा आहे. या सिनेमाची पटकथा हेमंत ऐदलाबादकर यांनी लिहिली आहे.

अमिताभ यांनी यापुर्वीही ‘आक्का’ नावाच्या सिनेमात जया बच्चन यांच्यासोबत कॅमिओ केला होता. या महिनाअखेरीस या सिनेमाचं शुटिंग सुरु होईल असं सांगण्यात आलं. अमिताभ सध्या नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. यात ते फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारतील.

 

Recommended

PeepingMoon Exclusive