By  
on  

‘लुकाछुपी’ सिनेमाच्या यशानंतर क्रिती सॅनॉनने वाढवली फी

‘लुकाछुपी’ सिनेमाने कृती आणि कार्तिकच्या गळ्यात यशाची माळ घातली. या सिनेमाच्या यशाने दोघांच्याही खात्यावर एका यशस्वी सिनेमाची नोंद झाली आहे. कमी बजेटच्या या सिनेमाने जवळपास १०० कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे क्रिती आणि कार्तिकही एका सिनेमाच्या यशाची खात्री देऊ शकतात यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळेच क्रितीने तिची फी वाढवली आहे.

क्रितीकडे सध्या हाउसफुल 4' आणि 'अर्जुन पटियाला’ हे दोन सिनेमे आहेत. ती सध्या अमर कौशिकच्या सरोगसीवरील सिनेमासाठी तयारी करत आहे. याशिवाय तिच्याकडे राकेश ओम प्रकाश मेहरा एका सिनेमाची ऑफर आल्याचं समजलं आहे. क्रितीने तिच्या मुळ मानधनात ४० %नी वाढ केली असल्याचं समजलं.

Recommended

PeepingMoon Exclusive