By  
on  

नेटीझन्समध्ये नाराजी तरीही 'स्टुडंट ऑफ द इयर २’ने कमावला कोटींचा गल्ला

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असा करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ रिलीज झाला आहे. यातील यंगब्रिगेड म्हणजेच टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांची केमिस्ट्री रसिकांना आवडली आहे. पण सोशल मिडियावर मात्र या सिनेमाची चांगलीच खिल्ली उडवली गेली. पण असं असलं तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.

या सिनेमाने आतापर्यंत म्ह्णजेच तीन दिवसात जवळपास ३८.८३ कोटींचा गल्ला जमवला आहे. करणने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास १२.०६ कोटी रुपयांचं होतं. सध्याची आकडेवारी पाहता हा सिनेमा लवकरच ५० कोटींचा आकडा पार करेल अशी आशा आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन पुनीत मल्होत्राने केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive