By  
on  

विवेक ओबेरॉयने कमल हसनच्या ‘या’ विधानावर व्यक्त केलं सडेतोड मत

विवेक ओबेरॉयने अलीकडेच कमल हसन यांच्या नथुराम गोडसेवरील विधानवरून चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. विवेक सध्या पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमधून रसिकांसमोर येणार आहे. कमल यांनी एका सभेत ‘देशातील पहिला आतंकवादी हिंदू होता’ असं विधान केलं होतं. यावर विवेकने ट्वीटकरून हे विधान केलं आहे. विवेक म्हणतो, प्रिय कमल सर, तुम्ही महान कलाकार आहात. ज्याप्रमाणे कलेचा कोणताही धर्म नसतो, त्याचप्रमाणे आतंकवादाचाही नसतो ! तुम्हाला वाटत असेल गोड्से आतंकवादी असेल. पण यासाठी तुम्ही ‘हिंदू’ शब्दाचा वापर का करत आहात? कारण तुम्ही मतांसाठी मुस्लिमबहुल भागात आहात म्हणून? याशिवाय विवेकने आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘या देशाला विभाजित करू नका, आपण सगळे एक आहोत. जय हिंद’. यावर कमल यांची काय प्रतिक्रिया हे कळू शकलं नाही. कमल हसनने मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली आहे. याद्वारे कमल यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे.

https://twitter.com/vivekoberoi/status/1127804762747883520

https://twitter.com/vivekoberoi/status/1127804765797113857

Recommended

PeepingMoon Exclusive