‘मीटू’ प्रकरणात नानाच्या क्लीन चीट प्रकरणी तनुश्रीची स्पष्टोक्ती

By  
on  

सध्या बॉलिवूडमध्ये गाजत असलेला मुद्दा म्ह्णजे तनुश्री- नाना पाटेकर वाद. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर ‘मीटू’ अंतर्गत आरोप केले आणि बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी नानाला क्लीन चीट मिळाल्याची चर्चा रंगली आहे. पण तनुश्रीने या सगळ्या वृत्ताचा नुकताच खुलासा केला आहे. नानांना कोणतीच क्लीन चीट मिळाली नसल्याचं तनुश्रीने स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणाचा खुलासा करताना तनुश्री म्हणते, मला या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी खुप कष्ट पडले. त्यामुळे इतक्या सहज कुणालाही क्लीन चीट मिळणं शक्य नाही. याशिवाय चार जणांविरोधात तक्रार नोंदवली असता एकाच व्यक्तीला क्लीन चीट कशी काय मिळू शकते? त्यामुळे नानांना क्लीन चीट मिळाली या वृत्तात कोणतंही तथ्थ्य नाही.’ यावर तनुश्रीचे वकिल नितीन सातपुते हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन याविषयी स्पष्ट करणार असल्याचंही तिने सांगितले.

Recommended

Loading...
Share