By  
on  

मंगेश हाडवळे यांच्या ‘मलाल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, दिसणार हे नवे चेहरे

सध्या स्टार किड्सच्या डेब्युची चर्चा आहेच. त्यात आणखी एका नावाची भर पड्ली आहे. हे नाव आहे मिजान जाफरीची. मिजान जाफरी आणि संजय लीला भन्साळींची भाची शरमीन सहगल भन्साळींच्या आगामी ‘मलाल’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे मंगेश हाडवळे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. मंगेश यांचा हा दुसरा बॉलिवूड सिनेमा आहे. यापुर्वी त्यांनी ‘देख इंडिया सर्कस' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=zRuL6Ykrnrg

या सिनेमाचा ट्रेलरमध्ये चाळीतील कुटुंबाची कथा दाखवली आहे. मराठी मुलगा आणि अमराठी मुलगी यांच्यात भांडण आणि मग प्रेम या वाटेने जाणारा हा सिनेमा नेहमीच्या भन्साळी पॅटर्नने जाताना दिसत नाही. मिजानला वडिल जावेद जाफरीकडून अभिनयाचा वारसा मिळालेला आहे तर बेला मामा संजयलीला भन्साळींचं दिग्दर्शन पाहात मोठी झालेली आहे. हा सिनेमा २८ जूनला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive