बॉलिवूडमध्ये सध्या एका ऑनस्क्रीन जोडीची चर्चा खुप आहे, ती म्हणजे सलमान आणि आलिया. ही जोडी आगामी इन्शाअल्लाह’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे. संजय लीला भन्साळी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या जोडीच्या एकत्र येण्याने फॅन्समध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
या सिनेमाची चर्चा रिलीजपुर्वीपासून होत आहेच. याशिवाय रिलीज होण्यापुर्वीपासूनच या सिनेमाने कोटींचा गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. या सिनेमाचे म्युजिक राईट्स ३० कोटींना विकले गेले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार सारेगामापा म्युजिकने हे राईट्स खरेदी केल्याचं समजलं आहे. या म्युजिक राईट्सची किंमत इतकी असण्यामागे कारण भन्साळींच्या सिनेमातील दर्जेदार संगीत संयोजन होय. या सिनेमातील गाण्यांमध्ये काही जुन्या दर्जेदार गाण्यांची धुनही ऐकायला मिळू शकते. विशेष म्हणजे हा सिनेमा लव्हस्टोरी असल्याने यात उत्तम संगीताची मेजवानी असेल. हा सिनेमा २०२०च्या ईदला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे.