By  
on  

‘साहो’च्या पोस्टर मधून दिसला प्रभासचा हटके अंदाज, या दिवशी होणार सिनेमा रिलीज

बाहुबलीनंतर प्रभासच्या साहोची रसिकांमध्ये खुप उत्सुकता होती. या सिनेमात प्रभास हटके भूमिकेत असल्याची चर्चा आधीपासून होती. प्रभासने नुकताच हे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केलं आहे. या बिग बजेट सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.

https://twitter.com/PrabhasRaju/status/1130722472020496384

हे पोस्टर शेअर करतानाच्या कॅप्शनमध्ये प्रभास म्हणतो, डार्लिंग्ज माझ्या साहो सिनेमाचं ऑफिशिअल पोस्टर खास तुमच्यासाठी शेअर करत आहे. आपली भेट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये.... या बिग बजेट सिनेमात प्रभाससोबतच  बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत असून हिदींसोबतच हा सिनेमा तेलुगू, तमिळमध्ये डब होणार आहे.या सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १५ ऑगस्ट्ला या सिनेमाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगळ’ आणि जॉन अब्राह्मच्या ‘बाटला हाऊस’शी होईल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive