उत्तर मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात लढत रंगली आहे. पण आत्तापर्यंतच्या प्राथमिक मोतमोजणीनुसार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत रंगणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अनेक सेलिब्रिटींप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आता राजकारणात आपली जादू दाखवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.